मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : वाकडी तर वाकडी📘*
*🔸मंगळवार : १७ /०२/२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वाकडी तर वाकडी*
आहे मी इमानदार
चोरी कराल तर
खबरदार खबरदार
माझी नजर धारदार
जागतो मी रात्रभर
त्रास तुम्हा नको तसूभर
करतो मी वेळीच सावध
नको कुणाची व्हाया पारध
मोती टिप्या कालू शेरू
म्हणा मला काही
मी तुमच्या घराचे
सतत राखन करत राही
माझी शेपटी तेवढी वाकडी
बर वाकडी तर वाकडी
त्यामुळे माझी इमानदारी
थोडीच होते तोकडी
असेना का शेपटी माझी
मग वाकडी तर वाकडी
*शारदा जोशी कुलकर्णी*
*तालुका, जिल्हा बीड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
वाकडी तर वाकडी
आईची नथ वाकडी
नाकात घातल्यावर
शोभून दिसते साडी…!!
पैठणी साडी छान
पदर जरतारी भारी
मोराची नक्षी त्यावर
कोरली कशी न्यारी…!!
कंठात नाजूक ठुशी
त्याखाली मिनिगंठण
सुंदर शोभे लक्ष्मीहार
सोन्यात मढलेले गंठण …!!
पायाच्या बोटात जोडवे
नि मुक्या घुंगराचे पैंजण
कपाळी चंद्रकोर टिकली
हातात पाटल्या नि कंगण…!!
सर्वांशी प्रेमाने बोलते
नाही कोणाशी वाकडी
आभाळाएवढी माया
प्रेमापुढे धरणी तोकडी…!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
वाकडी तर वाकडी
मी आहे फाकडी
सुटेल तोंडाला पाणी
मी आहे रानची राणी.
मला मिळवायला
मुलं मारतात उड्या
सापडली रे सापडली
गोड आहे गाड्या .
पित्तशामक म्हणून
जेवणात माझा मान
चटपटीत भेळीत
मला अग्रस्थान.
सावळे रूप वाकडे
खाऊगुल्ले फाकडे
चटक-मटक खातात
आंबट वाकडी म्हणतात.
ओळखलं का मला
मी आहे चिंच वाकडी
मला पकडायला
घेऊन या आकडी.
*सौ विमल धर्माधिकारी वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
ओळखलं का मला?
मी आहे काकडी
हिरव्यागार वेलीवर
आहे वाकडी तर वाकडी
जीवनसत्वानी भरपूर
बहु्गुणी मी छान
रोजच्या जेवणात सलादात
पहिला मलाच मान
फेशियल मध्ये वापर
चेहरा करतो तजेलदार
तहान भूक भागविते
कार्य माझे महान
कच्ची काकडी खावी
नियमित आहारात
रोगप्रतिकार शक्ती वाढविते
किमया घडविते आयुष्यात.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
भाज्यांची दुनिया किती गं मजेदार
टोपलीत सगळ्या करतात गोंधळ फार
काकडी म्हणे मी वाकडी तर वाकडी
तरीही उन्हात देते गार सावली थोडी थोडी
टोमॅटो लालबुंद गाल फुगवून म्हणे
माझ्यावाचून कोशिंबीर नाही बने
मिरची तिखट थोडीशी चिडली
माझ्यामुळेच चव जरा भिडली
गाजर लालसर मान डोलवी
माझ्यामुळेच तब्येत खुलवी
आली आई मग हसत हसत
टोपली घेतली अलगद उचलत
एकत्र आल्या तर भाजी रंगते,
एकीमध्येच खरी मजा दंगते
*कु माधुरी घनश्याम कावडे*
ता. वणी जि. यवतमाळ
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
मी अशी मी तशी म्हणा कोणी काही
जेवणात लज्जत माझ्या विना नाही
हिरवी कधी पांढरी कधी, सडपातळ कधी जाड
रसरशीत माझ्या फोडी त्याशिवाय अपुरी वाढ
मीठ चटणी लावून कधी कोणी मारती ताव
कोशिंबीर करायची तर आधी मलाच वाव
माझ्याशिवाय कसे ताट दिसते अपूरे
मला पाहताच लहान थोर खुश होतात सारे
मी कोण मी कोण, मी आहे काकडी
म्हणा कोणी काही वाकडी तर वाकडी
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
नाव नका ठेवू मला
वाकडी तर वाकडी
मी आहे हिरवी पांढरी
लांब लांब काकडी
उपयोगी मी सगळ्यांना
जेवणात मला किती मान
सलाद माझे लागते भारी
कोशिंबीर बने किती छान
थालीपीठ माझ्यामुळे पौष्टीक
मुले मला आवडीने खातात
सशालाही मी आवडे खूप
राहते मी शेतात मळ्यात
वाकडी तर वाकडी
घेते मी लांब उडी
बांधणार मी मोठी माडी
घालणार महागडी भरजरी साडी
*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
हिरवी हिरवीगार
मी आहेच रसदार,
कोवळी लुसलुशीत
लज्जत वाढते फार…
सलाड म्हणून मला
खाता कसे कापून,
गोल गोल चकत्या
खावा मीठ टाकून…
कोशिंबीर बनवता
माझा वापर करून,
जेवतांना माझ्याने
खाताय पोट भरून…
नका हिनवू मला
वाकडी तर वाकडी,
थंडगार खायला
धावून येते काकडी…
लठ्ठपणा घालवा
मला रोज खाऊन,
वजन कमी होईल
मला रोजच पाहून…
मी ही आले आता
दंडगोल रूप बनून,
तिखट मिठ लावून
खावं मला चिरून…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
रंगतदार चवदार
पाणीदार हिरवीगार
मी आहे बरं काकडी
चला वाकडी तर वाकडी
माझ्याविना चव नाही
येत कुठे जेवणाला
रूप पाहता आरस्पानी
पाणी सुटते तोंडाला
माझा रस चवदार
देतो नयनचक्षूंना आधार
चेहरा क्षणात उजळतो
काकडी लावता जराफार
मिळते अगदी स्वस्त
पण पोटासाठी मस्त
उन्हाळा होतो सुकर
चला करा आता फस्त
*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
त्या सुंदर वेलीवर
फूल दिसले पिवळे
मज नव्हती कल्पना
त्यास फळ येईल कोवळे
वाढ होताच देहाची
का झाला वाकडा कणा
नानाविध प्रश्न पडले
माझिया बालमना
मी उत्सुकतेने विचारले
तू आहेस ना काकडी
तू अताशा झालीस
कि जन्मतःच आहे वाकडी
राहु दे रे बाळा मला
मी वाकडी तर वाकडी
किती स्वादाने तुम्ही खाता
तेव्हा कुठे जाते तुमची हेकड़ी
ही दुनिया असीच आहे
न्याहाळती फक्त रंग रूप
कूब्जेला कृष्णाने उद्धारीलेचना
फक्त कूबडेपणाने दिसे कुरूप
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
वाकडी तर वाकडी
आजी कंबरेतून वाकडी
हता मध्ये काडी
आजी आमची थाडी
आजीचा आवाज करडा
हातात तीच्या दमडा
मुले येई धावत
आजीला खाऊ मागत
वाकडी तर वाकडी
नजर तीची करडी
तिच्यात नसे दुजाभाव
ममता असे ह्रदयी ठाव
शब्द तीचे कोमल
मन तीचे विमल
ह्रदयी फुलले कमळ
मुलांसारखी सोज्वळ
झाडावर बसले बंदर
आजी अमुची सुंदर
हातात तीच्या पेढा
मुले घाली वेढा
*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
*वाकडी तर वाकडी*
हिरवीगार रसदार
आहे ताजी काकडी
ताटाची शोभा वाढवते
दिसते मी जरी वाकडी…१
मीठ लावून खाण्यास
सारेच होता आतुर
किती खाशील बस कर
होशील बघ बकासुर…२
वेलीवर दिसते मी
डौलदार छान छान
वाकडी तर वाकडी
जेवणात मला मान…३
जीवनसत्त्वे माझ्यात
ए बी आणि सी असे
तरी तुम्ही मला वाकडी
म्हणताच बुवा कसे..?..४
रूप जरी नसले मला
गुण मात्र भरले खचून
बाजारातून कसे मग
मला घेता वेचून वेचून…५
आकार माझा दंडगोल
शिकता तुम्ही गणितात
खाते वेळी साल काढून
उभे आडवे चिरतात….६
*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🥒🔸🥒➿➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



