
व्हॉटस्अप स्टेट्स
मानवाचा ठरलाय मोबाईल
..अविभाज्य घटक..
बदल घडवी मानव
जीवनात संगणक…
….व्हॉट्स अप स्टेट्स
बघुन वाटे कधी गंमत
सकाळ दुपार रात्रीपर्यंत
निरनिराळी माहितीची रंगत….
…. सुख दुःख वाढदिवस
होतो माहित अचानक
विविध फोटो लिंक ईमोजी
सुप्रभात टाकतो नवयुवक
स्टेट्स ठेवण्या सेल्फी त
कुणी जीव गमावून बसतात
काळे गोरे फोटो टाकून
लाईक्स मिळवण्या झुरतात
व्हॉट्स अप स्टेट्सवर
देतो सदिच्छेने अभिनंदन
फोटो प्रेमभाव जिव्हाळाचे
बघता होई सर्वाचे मनोरंजन
भक्तीभावाचा झरा वाहेओसंडून
सुविचार मनाला ठसतात
प्रत्येक जण लाईक कमेंट
मध्ये.. व्यर्थ वेळ घालवतात
….व्हाट्सअप मध्ये विविध अप
बघता जाई तल्लीन होऊन
न बोलणारा देतो लाईक्स घेतो मैत्री
जमवून ,फायदे तोटे घ्यावे जाणून
….तीस सेकंदाचे व्हिडीओ
फोटो ठेवून होई समाधान
वाढे प्रतिष्ठा आदानप्रदान
व्हॉट्स अँंप् स्टेटस झाले वरदान…
अंजू प्रमोद येवले, पडोळे
उमरेड जिल्हा नागपूर



