ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये विधी साक्षरता शिबीर
तुषार थळे, प्रतिनिधी
ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये विधी साक्षरता शिबीर
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबा: मंगळवार, दि.०९ ऑगस्ट २०२४ रोजी,सकाळी ११:३० वा.ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेज आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग,सचिव मा.ॲड.अमोल अ.शिंदे ,वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत मार्गदर्शन करताना युवांनी सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिक सुधारणा करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.स्त्रीभ्रूण हत्या टाळण्यासाठी युवांनी स्वतःच्या जाणीवा आणि संवेदनशीलता वृद्धिंगत करण्याची गरज आहे असे आवाहन केले.
जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य मा.ॲड तन्मय म्हात्रे यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन या विषयावर मार्गदर्शन करताना युवांनी सार्वजनिक भान ठेवत,समाज माध्यमांचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सदस्य ॲड.निलोफर शेख यांनी स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधात्मक कायद्यांची गरज आणि उपयोगिता याबाबत मार्गदर्शन केले. आय.क्यु. ए. सी. समन्वयक डॅा.संदिप घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या शिबीराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील ,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले.प्रा.पियुषा पाटील,प्रा.कौशिक बोडस,प्रा.सुरज पूरी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.निलम म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लॅा कॅालेजमधील आय.क्यु.ए.सी. आणि लिगल एड सर्व्हिसेस समितीमार्फत प्रा.चिन्मय राणे यांनी शिबीराचे आयोजन केले.



