
0
5
7
9
0
0
धुंदी
आवरता आवरेना का आज ते मला
कितीदा सावरावे उनाड या मनाला
उगा चंचल वागे, तुजकडे नयन लागे
घेई धाव मनभ्रमर, तुझ्याच मागे मागे
तू गुलाबी चांदणं, मी होतसे चकोर
ह्या नशिल्या क्षणाची, धुंदी नयनावर
बघ रेंगाळला चंद्र दूर क्षितिजावर
कल्हारी पहुडला निपचित हा भ्रमर
बहर रातराणीला, पल्लवीत वेलीला
चांदण्यात मंद तो सुगंध विरलेला
गंधाळला वारा, वाहत जाई दूर
धुंदल्या दिशा दाही, धुंदीत लागे सूर
गंधित मन माझे, अस्तित्वही विसरले
सुगंधी श्वासात, हे मन चिंब ओले..
धुंदीच चढली, आज सा-या क्षणांना
उधळले सुख असे विसरून वेदनांना..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
5
7
9
0
0



