Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

वसुधा नाईक निर्मित ‘रमाची पाटी’ शॉर्ट फिल्मचा मुलांनी घेतला आनंद

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

वसुधा नाईक निर्मित ‘रमाची पाटी’ शॉर्ट फिल्मचा मुलांनी घेतला आनंद

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे: दि. 2/08/2025 वसुधा फाउंडेशन तर्फे… आदर्श विदयालय, शुक्रवार पेठ पुणे. या शाळेमध्ये माझी शॉर्ट फिल्म रमाची पाटी दाखवण्यात आली.मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटण्यात आला.

मा. मुख्याध्यापिका नीलिमा लांजेवार यांनी शाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. तसेच मा. डॉ. मधुसूदन घाणेकर त्यांनी बे दुणे चकली आणि एकपात्री कार्यक्रम मुलांसाठी केला.त्यांचेही धन्यवाद! वसुधा नाईक यांनी बालगीते घेतली. या दोन्ही कार्यक्रमात मुलं छान रमली होती. शॉर्ट फिल्म पाहून झाल्यानंतर त्यांना मा. मुख्याध्यापकांनी फिल्म वर आधारित काही प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तरे जी मुले अचूक देतील त्या दहा मुलांना मधुसूदन घाणेकर यांच्या तर्फे मिठू मिठू पोपट हे प्रमाणपत्र देण्यात आले.

राजयुवा निर्मितीचे प्रकाशक गौरव पुंडे व काव्ययोग संस्थेचे संस्थापक योगेश हरणे या दोन्ही तरुण तडफदार नेतृत्वाचे मला मोलाचे सहकार्य नेहमीच मिळते तसेच आजही मोलाचा वाटा होता. ‘आईचे हळवे मन’ हा माझा कथासंग्रह मा. मुख्याध्यापिका नीलिमा लांजेवार व पाचवी ते दहावीचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड सरांना भेट दिला.

या दोघांशी मीटिंग करून पुढील कार्यक्रमाच्या तारखा घेतल्या. आदर्श विद्यालयातील सर्व शिक्षकांचाही कार्यक्रमासाठी खूप छान सपोर्ट मिळाला. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे