अलिबाग बाजारपेठेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग बाजारपेठेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: ( दि २५ जुलै) : शहरातील बाजारपेठ येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने अलिबाग येथील रहिवासी सहभाग झाले होते.
गेल्या सहा वर्षापासून दिंडीचे आयोजन अशोक प्रधान जयंतीशेठ, प्रधान परिवार शैलेश मामा जितेंद्र मेहता.ठाकूर. सागर प्रधान . मदन मोरे आशिष रानवडे कल्पेश थळे. किशोर हजारे. दिंडी यशस्वी करण्यात मोलाच्या वाटा असतो तसेच या प्रसंगी महिला मंडळाचा पण मोठा सहभाग होता तसेच प्रिझम संस्थेचे तपस्वी गोंधळी मॅडम यांचा सहभाग होता व त्यांच्याकडून सुंदर असे लेझीम पथकाचे सहभाग झाले होते.
या दिंडीत अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन तर्फे सहभाग झाले होते अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे खजिनदार विवेक पाटील सेक्रेटरी विकास पाटील उपाध्यक्ष राकेश दर्प तसेच योगेश सावंत रायगड खजिनदार गट्टू शेठ आदी मान्यवर उपस्थित होते संध्याकाळी पाच वाजता बाजारपेठेतून टाळाच्या गजरात दिंडीचे सुरुवात झाली व संध्याकाळी सात पर्यंत ते विठ्ठल मंदिरात दिंडीचे आगमन झाले व नंतर सर्व विठ्ठल भक्तांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन झाले व नंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला व नंतर मोठ्या भक्ती भावाने दिंडीचे समारोप करण्यात आले.



