0
4
8
2
8
7
शोकांतिका
लहरीबाज निसर्गाचे
चुकतात सारे अडाखे
अस्मानी सुलतानीचे
बसतात सदैव तडाखे… //
ओला कधी कोरडा
येई दुष्काळाचा फेरा
मग उधार उसणवारीने
करा दुबार तिबार पेरा…//
खळ्यात कांही पडेना
येथे मनाजोगती रास
या गळ्यातून निघेना
कर्ज फेडीचा फास… //
मोल मिळेना घामाचे
बेभाव विकतो माल
पाणी होतय रक्ताचे
सांगावे कुणास हाल… //
या कृषि प्रधान देशात
कृषकाची शोकांतिका
केविलवाण्या जीण्याची
कधी व्हावी सुखांतिका… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनर
0
4
8
2
8
7



