
0
6
8
5
2
7
अर्धांगिनी
तू फक्त बायको नव्हे
लक्ष्मी आहेस घरची
समंजस नि समजदार
अन् प्रेमळ स्वभावाची
सुखदुःखाच्या प्रसंगात
साथ तुझी आधाराची
काळजी धरुन राहतेस
बनून सावली सर्वांची
खोट्याची चीड तुला
धरतेस सत्याची कास
परखड स्वभाव तुझा
आवडतो मला खास
बायको आई सून जाऊ
न्याय देतेस भूमिकांना
आदरभाव हा सर्वांप्रती
सांभाळशी सखे नात्यांना
खरंच भाग्यवान मी
अशी अर्धांगिनी मिळाली
नवराबायको म्हणून
वीण नात्याची घट्ट जुळली
हे ईश्वरा तुझ्याकडे
एकच माझी इच्छा
लाभू दे निरोगी दीर्घायु
हीच जन्मदिनी शुभेच्छा.
बळवंत डावकरे
मुखेड, जि नांदेड
0
6
8
5
2
7



