बौद्धांचे संस्कार – संभ्रम आणि वास्तव
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
बौद्धांचे संस्कार – संभ्रम आणि वास्तव
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजन
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
नागपूर: बौद्धांमधील हिंदूच्या सणांचे वाढते आकर्षण आणि इतिहासाचा संदर्भ देत दिपदानोस्तव असो किंवा इतर सण जे हिंदूचे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपले बांधव साजरे करीत आहेत. हा एक चिंतेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे हे सण सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या 1956 नंतर बौद्ध झालेल्या लोकांकडून जास्त प्रमाणात साजरा केले जात आहेत . अनेक विचारवंत सुद्धा वेगवेगळे (त्रिपीटक, दिपवंस यासारख्या) प्राचीन ग्रंथांचे संदर्भ देत हिंदू सण साजरे करण्यावर भर देत आहेत. सगळे हिंदूचे सण आपलेच आहेत. आपल्याकडूनच ते गेलेले आहेत तेव्हा आपण साजरे करायला हरकत नाही असे समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिरवल्या जात आहेत.
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजन सैनिक माया तिरपुडे उपाध्यक्ष महिला विंग महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 31/ 10/ 2024 दुपारी 1:00ते 4:00 दरम्यान करण्यात आले. विषय होता ‘बौद्धांचे संस्कार – संभ्रम आणि वास्तव’ या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. समाजात वावरतांना हिंदूच्या बरोबरीने त्यांचे सण साजरे करण्यात आनंद मानणाऱ्या आपल्याच बांधवाना कसे परावृत्त करता येईल यावर सखोल चर्चा झाली. त्यातून काही मुद्दे पुढे आले.
1) बदलत्या काळानुसार बौद्ध समाज हिंदुत्वाकडे खेचला जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी वेळोवेळी चर्चा सत्र, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात यावे.
2) वर्षावासात आताच्या काळानुसार होणारे भोजनदान, कठीण चिवरदान, रात्रभर चालणारे महापरित्रान यात आधुनिक काळानुसार बदल व्हावा. त्याऐवजी दुसरे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. 3)इतिहास उगाळत बसण्यापेक्षा आता वर्तमानात काय सुधारणा करता येईल यासंबंधी विचार केला पाहिजे.
4) मुलांच्या मनावर शाळांतून होणारे संस्कार कोरले जातात. आणि त्या जर विशिष्ट धर्माच्या अनुकरणावर भर देत असतील तर त्यावर आळा घालण्यासाठी पालकांनी सतत जागरूक असणे आवश्यक आहे.
5) बौद्ध समाजात पुढीलप्रमाणे संस्कार केले पाहीजेत.
1)गर्भसंस्कार
2)नामकरण संस्कार
3)विद्यारंभ संस्कार/धम्मदीक्षा संस्कार.
4)विवाह संस्कार
5) मृत्यूसंस्कार
लग्नात हळद लावणे, पायधूनी करणे, ओटी भरणे, जेवणावळी यासारखे संस्कार बंद झाले पाहिजेत. त्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.
6)सैनिकांनी विहाराविहारात गावागावात जाऊन बाबासाहेबांचे विचार रूजविले पाहिजेत.
या चर्चासत्रात सैनिक कांतीलालजी भांगे अध्यक्ष महाराष्ट्र, माया तिरपुडे उपाध्यक्ष महीला विंग, महाराष्ट्र, सविता धमगाये अध्यक्ष महिला विंग नागपूर जिला, ब. ना. वासे कोशाध्यक्ष महाराष्ट्र, उज्वला उके सचिव महीला विंग महाराष्ट्र, रंजना वासे बौद्धिक प्रमुख महाराष्ट्र, सैनिक कला रामटेके, परिता झोडापे, वर्षा सोनटक्के, भामराव म्हैसकर रेखा रामटेके, प्रतिभा मेंढे, अनिता बनकर, प्रज्ञा दुरूगकर,कुंदा पाटील,रामटेके ताई वकील पेठ, ममता नाईक, सारीका हुमणे, सुनिल बनकर यांनी चर्चा सत्रात सहभाग घेतला.



