कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
आम्ही नाराज नाहीच वैशाली अंड्रस्कर तुकुम जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
3
आम्ही नाराज नाहीच
होय थोडेसे गाल फुगले आहेत
पण रागाने नव्हे…..
जरा लाडू तोंडात भरले आहेत
कडू कारलं नाही खाल्लं आम्ही
पण साखरही नाही पेरली तोंडात
म्हणून जरासे शब्द कडवे आहेत
अहो…
आम्ही नाराज नाहीच तुमच्यावर
फक्त नि फक्त मौनव्रत साधले आहे
सुटेल जेव्हा मौनव्रत आमचे….
सुसाट चालेल बघा तोंडाचा पट्टा….
अन् तुम्हीच म्हणाल…..
कशासाठी करता आमची थट्टा ?
वैशाली अंड्रस्कर
तुकुम जि.चंद्रपूर
==========
0
4
8
2
9
3



