
0
4
8
2
8
4
आचरण
कोळसा तो कोळसाच
काय करावे निरिक्षण
मात्र इथे तर सुवर्णाचे
होतेय अग्नि परिक्षण.. //
सूर्य प्रकाशा सारखेच
सत्य सुंदर विलक्षण
मात्र आभासी मायावी
असत्याचे अवलक्षण.. //
अचल अढळ सुशिल
हवे विचार उच्चारण
बोले तैसा चाले त्याचे
असते शुद्ध आचरण.. //
सुवर्णगुण संप्पनतेचे
दुर्मिळ झाले उदाहरण
इथे करावे तरी कुणाचे
कळेना आज अनुकरण.. //
अशा घोर कलियुगात
दिसेनात आदर्श चरण
हा कुठे माथा टेकवावा
अन् जावे कुणा शरण.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
8
4



