कवितानागपूरमराठवाडाविदर्भसाहित्यगंध
सूर जुळावे फिरूनी; संग्राम कुमठेकर
0
4
8
2
9
3
सूर जुळावे फिरूनी
गुलाबी व्यथांचे गाठोडे
हृदयात किती जपशील ?
हुंदक्यांना दाबून सांग
शांत कशी तू झोपशील ?
वाट मोकळी करून दे
अंतरीच्या गं वेदनांना
झुगारून देशील जेव्हा
हिंमतीने गं बंधनांना
घेशील मोकळा श्वास
शृंखला त्या गं तोडताच
सूर जुळावे फिरूनी
ऐकीव शंकांना खोडताच
गुलमोहर गं अंगणातील
साद घालतोय गं प्रेमानं
समजून घेऊ गं ऐकमेका
प्रितवेल वाढेल जोमानं
भाव अंतरीचा कळता
प्रितसखी खुदकन हसली
प्रितझुला मुसमुसलेला
ओवाळण्या मिठीत बसली
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=============
0
4
8
2
9
3



