Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

दुसरा राज्यस्तरीय डिजिटल वधू-वर पालक परिचय मेळावा

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

दुसरा राज्यस्तरीय डिजिटल वधू-वर पालक परिचय मेळावा

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि १५) महाराष्ट्रातील गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या समस्त गवळी विकास संस्था (र.नं. ३१३/२४, महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय डिजिटल वधू-वर पालक परिचय मेळावा दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाला. या डिजिटल मेळाव्यात राज्यभरातील हजारो समाजबांधव आणि ११३ विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांचे पालक सहभागी झाले.

संस्थेचे प्रदेश अध्यक्ष इंजि. अशोक भाले यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजातील युवा पिढीला प्रेरणा देणारे विचार मांडले. आजचा हा डिजिटल वधू-वर पालक परिचय मेळावा फक्त विवाहासाठी जोडणी करणारा कार्यक्रम नाही, तर गवळी समाजाच्या एकतेचा, प्रगतीचा आणि सुधारणांचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. गवळी समाज हा मेहनती, प्रामाणिक आणि परंपराप्रेमी समाज आहे. पण आजच्या काळात पारंपरिक विवाह पद्धतींमध्ये भौगोलिक अडचणी, आर्थिक ओझे आणि अनिष्ट रूढी यांचा मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणूनच आम्ही डिजिटल माध्यमाचा अवलंब केला आहे. हे माध्यम आम्हाला राज्याच्या कोपऱ्याकोपऱ्यातील कुटुंबांना एकाच व्यासपीठावर आणण्याची संधी देते.

समस्त गवळी विकास संस्था ही अराजकीय, नोंदणीकृत आणि शिस्तबद्ध संस्था आहे. आम्ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा उपक्रमांद्वारे समाजात नवीन जागृती निर्माण होते.

आजच्या या यशस्वी आयोजनासाठी प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. किसन झिपरे, प्रदेश सरचिटणीस प्रा. शैलेश हातबुडे, प्रदेश कोषाध्यक्ष मदन साखरकर, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मिरावाले, प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर देशमुख, प्रदेश संघटक विजय देशमुख, वीणाताई साखरकर, प्रा. मनोहर ठाकरे, सोमनाथ नडंगे, यादव लोहंबरे, दुधराम लोहंबरे, कृष्णा बोपटे, मनोहर मोरे, आनंदराज साठे, रोशन गवळी, यांच्यासह इतर सदस्य गवळी समाज बांधवांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे