0
4
8
2
8
6
चकवा
प्रेमास्त्र तू नको डागू
चालणार नाही गं जादू
मोहात या फसणारा
नाही मी नाटकी साधू
नयनास्त्र गं गेले वाया
अश्रूंचा वाहू नको पाट
सौदंर्याला गं भाळणारी
माझी नाही प्रेमाची वाट
मोहक हास्य नि अदांना
भुलणार नाही गं साजने
प्रीतझुला तुझा हालवून
सोडून दे गं तुझे लाजने
स्थितप्रज्ञ मी गं तपस्वी
डोळे दिपतील तेजापुढे
भुरळ नाही चिंब देहाची
फिरू नकोस गं मागेपुढे
ब्रम्हास्त्र तुझे गं भयंकर
लागले कसे गं जिव्हारी
चकवा तुला देता देता गं
मधुगंधाचा झालो पुजारी
संग्राम कुमठेकर, लातूर
0
4
8
2
8
6



