
बालदिनाचा आनंद
पंडित नेहरूंचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो.. यानिमित्ताने अनाथांची माय कै. मा.सिंधुताई सपकाळ यांच्या मांजरी, हडपसर येथील अनाथाश्रमास भेट दिली. खूप वर्षांपासून मा.सिंधुताईंना भेटायची इच्छा होती पण माझ्या शालेय कामकाजांमुळे मला तिथपर्यंत पोहोचता आले नाही. इच्छा अपूर्ण राहिली. पण बालदिन असल्याकारणाने मी तिथे पोहोचले आणि तिथे मुख्य म्हणजे मा.ममता ताई सपकाळ यांची कन्या भेटली त्यांना भेटून आनंद झाला आणि तेथील मुलांना त्यांनी रामायण पिक्चर बघायला नेलेले होते त्यामुळे मुलं काही भेटले नाहीत पण पूर्ण संकुल पाहिले आनंद झाला आणि मुलांसाठी मी खाऊन नेला होता तो त्यांना मी वाटायला सांगितला.
या आश्रमामध्ये माझ्या देखत दोन पालक आले होते आपल्या मुलांना तिथे सोडण्यासाठी. यावरून त्यांचे कार्य किती मोठे आहे ते समजले. त्यांच्या कार्याचा आढावा तिथले जे मॅनेजर होते त्यांनी आम्हाला पूर्ण आढावा दिला.कामकाज कसे चालते हे प्रत्यक्ष डोळ्यांन पहिले. तेथील स्वच्छता आणि तेथील मुलांचे वागणे जे दहा-बारा मुलं तिथे होते त्यांचे वागणे बघितले. तिथलं किचन पाहिलं. एकदम स्वच्छ आणि चकाचक किचन होते. बाकी परिसर अतिशय सुंदर, स्वच्छ होता. त्यांच्यासाठी कॉम्प्युटर आणि लॅब वरती चौथ्या मजल्यावर आहे आणि तीन मजले पूर्ण विद्यार्थ्यांची सोय होती.प्रत्येक खोलीमध्ये साधारण 16 ते 18 मुलं झोपतील अशी व्यवस्था होती आणि खूप छान व्यवस्था त्या रूममध्ये मुलांचे कपडे ठेवण्यासाठी पाच ते सहा कपाट होते.
खूप छान व्यवस्था पहायला मिळाली.आणि त्यांच्या पुरस्कारांच्या दोन-तीन मोठ्या मोठ्या रूम आहेत त्या पाहिल्या मन भरून गेलं एवढी सुंदर कारकीर्द असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना मी भेटू शकले नाही याचे वाईटही वाटले पण आज त्यांच्या संकुलला भेट देता आली.मला ममता ताई भेटल्या याचा आहे आनंद खूप झाला. त्यांना माझा दिवाळी अंक भेट दिला.माझा बालदिन छान साजरा झाला.
वसुधा वैभव नाईक
जिल्हा पुणे



