Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

माझी माय गं मराठी’ कवी संमेलन भिवापूर येथे उत्साहात संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 5 9 6 0 8

माझी माय गं मराठी’ कवी संमेलन भिवापूर येथे उत्साहात संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी
बिनधास्त्त वृत्ततसेवा मालेवाडा

मालेवाडा:- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा धोरणाला अनुसरून मराठी भाषेचे संवर्धन व समृद्धी तसेच नवोदितांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भिवापूर साहित्यिक मंच व भिवापूर ऑफिसर क्लबच्या वतीने नवोन्मेष मराठी कवी संमेलन – माझी माय गं मराठी’चे आयोजन करण्यात आले. साइंटिफिक कॉन्व्हेंट सभागृहात झालेल्या या संमेलनाला कवी व साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संमेलनाचे उद्घाटन तहसीलदार संजय राठोड यांच्या हस्ते झाले. गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव हे स्वागताध्यक्ष, तर ज्येष्ठ कवी व पत्रकार पुरुषोत्तम भिशीकर हे संमेलनाध्यक्ष होते. नगराध्यक्षा सुषमा श्रीरामे, सहायक पोलीस निरीक्षक रवि मस्कर, परिविक्षाधीन तहसीलदार रेशमा निकम, कृषी अधिकारी सुप्रिया कोकणी, प्रा. रंजना खवास व सरकारी अभियंता शांताराम मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवातk पुस्तकपूजन व महाराष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भिशीकर यांनी भिवापूर साहित्यिक मंचाच्या माध्यमातून दरवर्षी कवी संमेलनाचे आयोजन करून साहित्यिक चळवळ गतिमान करावी. शासकीय विभागातील साहित्यिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या चळवळीत भरीव योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कवी संमेलनात मराठी भाषा, स्त्रीवेदना, निसर्ग, प्रशासन, प्रेम, भिवापूरनगरी, सामाजिक एकता, परिवर्तन व विद्रोह अशा विविध विषयांवरील चारोळी, गझल, कविता व काव्यगीतांचे सादरीकरण करण्यात आले. भिवापूर तालुक्यातील विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी, शिक्षक तसेच नवोदित कवी अशा एकूण ४५ कवींनी सहभाग घेतला.

सहभागी कवींना सन्मानपत्र देऊन गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

उद्घाटन सत्राचे संचालन साबीर पटेल यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मंगेश जनबंधू व घनश्याम बनसोड यांनी केले, तर लव जनबंधू यांनी आभार मानले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी साबीर पटेल, प्रीती जांभूळकर, सुगत वाघमारे, मिथुन दुपारे, मेघा गुरनुले, धनपाल डांगे, नीरज तांबे तसेच साइंटिफिक कॉन्व्हेंटचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे