Breaking
कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बुद्ध जगाचे गुरु; प्रकाश गोधने

0 4 8 2 9 0

बुद्ध जगाचे गुरु

पंचशीलाचे तत्व
हृदयात अंतरी कोरू
कारूण्याचे बीज मनात
मनाच्या मातीत पेरू

सत्कार्य जीवनी करू
परिवर्तनाची कास धरू
साधू संतांचे आचरण
नित्य नियमाने स्मरू

कबीरांचे दोहे कंठात
तुक्याची गाथा हाती धरू
शिव शाहू फुले आंबेडकर
चरणी तयाच्या वंदन करू

गाडगे बाबाच्या झाडूने
अंधश्रद्धेला साफ करू
दगडातला देव नाकारू
माणसातला देव स्वीकारू

पुस्तकाच्या संग्रहाने
मेंदूची मशागत करू
अनुभवाच्या कसोटीवर
जीवनाचे सोने करू

डोंगराच्या शिंपल्यातील
बुद्ध काळजावर कोरू
स्वयंम दीप होवू सारे
समतेची शितल वाट धरू

निर्मित सारे नश्वर
मोह माया दूर सारू
शाश्वत हेच सत्य
वदले बुद्ध जगाचे गुरु

गोधने प्रकाश पुंडलिकराव
कंधार. जि.नांदेड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे