0
4
8
2
8
7
ढगाआडून
उन्हाळ्यात मध्यान्हवेळी
सूर्य,आग ओकतो ढगाआडून,
होरपळतात सजीव जीव
व्याकुळ होती तहान लागून.
सांगा,तो तरी काय करेल
त्यालाही असतो नित्यक्रम,
ज्यांचा त्याने,असतो ठरविलेला
वागण्याचा स्वतःचा दिनक्रम.
सृष्टीचे,नियमन असते सुरु
ठरल्याप्रमाणे निसर्गचक्र,
एकानंतर एक बदलतो ऋतु
सुरूच असते जीवन चक्र.
परिवर्तन नियम जगाचा
त्यानुसार वागावे लागतें,
वातावरणातील बदलानुसार
मार्गक्रमण करावेच लागते.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
====
0
4
8
2
8
7



