Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरसाहित्यगंध

लोकश्रम

महेश पुरसों काणकोणकर कालापूर बांध, तिसवाडी गोवा

0 4 8 3 0 0

लोकश्रम

पहाटेची चाहूल लागताच
खांद्यावर ओझं घेऊन तो निघतो,
घामाच्या थेंबातच त्याची उपासना,
मातीशी नातं घट्ट जोडलेलं
आणि हातांच्या रेषांतच भविष्य दडलंय.

तो राबतो उन्हात, वाऱ्यात, पावसात,
शरीर थकून गेले तरी मन थकत नाही.
रक्ताची शाई करून तो रेखाटतो अन्नाचे चित्र,
त्याच्या श्रमाशिवाय जग थांबून जाईल,
तोच तर जीवनाचा खरा शिल्पकार आहे.

पायाखालची जमीन साक्ष देते,
कष्टांच्या ठशांनी ती सजलेली असते.
डोक्यावरच्या आकाशालाही तो ओलांडतो,
स्वप्नं स्वतःची नसली तरी इतरांची पूर्ण करतो,
यातच त्याची खरी समाधी दडलेली असते.

घामाचा सुगंधच त्याची ओळख,
मातीच्या कणांत त्याचा चेहरा उमटतो.
रिकाम्या हातांनी तो सुर्यालाही पकडतो,
कष्टांना सोनं करायची ताकद त्याच्यात आहे,
म्हणून तोच खरा लोकांचा देव आहे.

असा हा लोकश्रम –
थकवा ज्याला कधीच हरवू शकत नाही,
त्याच्या श्वासांतूनच निर्माण होते गाणी,
त्याच्या कष्टांवर उभं राहिलंय जग,
तोच आहे जीवनाचा खरा आधारस्तंभ.

महेश पुरसों काणकोणकर
कालापूर बांध, तिसवाडी गोवा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे