ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे – खा. तटकरे
तुषार थळे, प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे सामाजिक काम वाखाणण्याजोगे – खा. तटकरे
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग (दि. ४) रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी पत्रकारितेबारोबर मोलाचे सामाजिक काम केलेआहे. जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामागार न्यायालय , स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय व स्वतंत्र दूरसंचार कार्यालय त्यांच्या लैखणीच्या फटका-यानी सुरू झाली आहैत. सागरगड -माचीच्या आदिवासींनाही भौतिक सुविधा साठी ंसाठी १० एकर जमीन शासनाकडून मिळवून दिली आहे. त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे असून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
बळवंत वालेकर लिखित ‘बळवंत मी, यशवंत मी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते अलिबाग येथे बोलत होते . ज्येष्ठ विधीज्ञ व जिल्ह्याचे माजी सरकारी वकील गोपाळराव लिमये अध्यक्षस्थानी होते . यगडचे लोकप्रिय खासदार सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील गोपाळराव लिमये होते . या कार्यक्रमानिमित्त रायगडचे जिल्हाधिकारी श्री किशन जावळे , जिल्हा परिषदेचे अँडि. सी. ई. ओ. सत्यजित बडे , कोकण विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसचालक गणेश मुळे यांचे शुभसःदेश वाचले गेले.
सदरवेळी ज्येष्ठ पत्रकार बळवंंत वालेकर यांच्या प्रास्ताविकानंतर आमदार महेंद्रशेट दळवी , माजी आयुक्त दिलीप पांढरपट्टे , (I, A. S.) गौळी समाजाचे अध्यक्ष राजेशजी मेहतर , कुमार आर्यन वालेकर तसेच ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळराव लिमये यांची भाषणे झाली. शेवटी सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन खोपोली येथील “जिद्द” चे कार्यकारी संपादक रविंद्र घोडके सर यांनी केले.
पुस्तकाचे लेखक बळवंत वालेकर यांच्या तर्फे नवनिर्वाचित खासदार सुनिलजी तटकरे यांचा मानपत्र , स्म्रुतिचिन्ह व भेटवस्तु देऊन करण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालैकर यांचा सन्मान विविध संस्थांनी केला .. त्यात यादव चौली गवळी समाज (रायगड , ठाणे , मुंबई , सोलापूर) अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळ , ज्येष्ठ नागरिक संस्था वाघोली , रायगड जिल्हा माध्यमिक शाळा निव्रुत्त मुख्याध्यापक मंच अलिबाग) ,को. ए. सो. निव्रुत्त मुख्याध्यापक मँच , अलिबाग , ग्रामस्थ मंडळ महाळुंगे (मुरुड ) , यांचा समावेश होता.
कार्यक्रमास आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील , कमळ पतहांस्थेचे संस्थापक गिरीष तुळपुळे , सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक , डाँ. चंद्रकांत वाजे,डाॕ डी. सी. शिवकर , अँड. विलास नाईक , अँड. प्रमोद पाटील , गौळी समाजाचे सेक्रेटरी प्रफुल्ल वालेकर , हर्षल पाटील ,अनंत गोंधळी इ. विविध क्षेत्रातील हितचिंतक उपस्थित होते.



