….आणि पोपट ‘हिरवा’ झाला..!
हर्षिता राहुल पाटील
…..आणि पोपट ‘हिरवा’ झाला..!
‘पोपट’ हा हिरव्या रंगाचा असतो खरा. पण मी मागील दोन वर्षापासून वर्गात, वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात नुसते वाचतच आले. अधून मधून नजरेस पडतोही म्हणा. परंतु, हिरवाच का? असतो पोपट. कुणाला घरी विचारायचं धाडस झालच नाही. कारण, भिती वाटायची. घरातील उगाच रागावतील आणि वेड्यात वगैरे काढतील. पण वाचता वाचता आता ‘पोपटपंची’ म्हणजे काय? तर, पोपट हिरवी मिरची, हिरवा पेरू खातो. पोपटाला लाल चोचही असते. पोपट हा एक पक्षी असून तो हिरव्या झाडावर राहतो. पोपट आकाशात उडतो. मला कधीकधी पोपट दिसतो. पोपट माझ्या एका मैत्रीणीकडे आहे. तिच्या घरी ‘हिरवा’ पोपट पिंज-यात राहतो. पोपट आकाशातही उडतो. पोपटाला, दोन डोळे, दोन पंख, दोन पाय असतात. पोपट लहान मोठेही असतात. वय काय असेल देव जाणे!
तर ही अशी बालमनाची पोपटपंची. एवढी माहिती आजवर घेतली. पण पोपट ‘हिरवा’ कसा झाला? कुठच वाचायला भेटले नाही. पोपट आकाशात फार कमी दिसतो. कोणाकोणी पोपटही पाळतात. जे पोपट पाळतात, ते लोक पोपटाला अंघोळही घालतात. त्यामुळे पोपट स्वच्छ राहतो आणि अधिकाधिक हिरवा दिसतो असे वाटते. कोणते कोणते पोपट बोलतात. कोणकोणते पोपट बोलतही नाही. आमच्याकडे बोलणारे पोपट मात्र खूपच कमी आहे. ‘बोलणारा खराखुरा पोपट एकदा बघेन म्हणते मी’. म्हणजे, तो बोलला की, विचारायला बरे की तू हिरवा कसा झाला?
पोपटाच्या हिरव्या होण्याचा शोधात कधी कधी अभ्यास राहून जातो. म्हणून मागील आठवड्यात नाद सोडला. आणि पोपटाचे छानसे मोठे चित्र काढले. वाटलं हिरव्या पेनाने काढले असते तर हिरवाच झाला असता ना? मग विचार केला,’आपला पोपट पांढरा दिसतो. आता आपण यालाच हिरव्या रंगात बुडवून घेऊ या’. ठरल्याप्रमाणे रंग, ब्रश घेतला आणि भरला रंग हिरवा. पांढ-या पोपट्याच्या शरीरात. ….आणि बघता बघता पोपट ‘हिरवा’ झाला.
बाललेखिका कु. हर्षिता राहुल पाटील
मोंढा,ता.हिंगणा जि. नागपूर



