0
4
8
2
9
0
शिवनेरी गडावर
भेदून गेली एक तुतारी
नाद गगन उरावर
सांगे वारा कानोकानी
बाळ आले शिवनेरी गडावर
कोल्ह्यांची कुईकुई
पुनवडीची माती माती खाई
नव्हता कुणी वाली मातीचा
सुस्कारे धरणी वरचेवर
सांगे वारा कानोकानी…
मावळ्यांची कांदा भाकर
पाणी पिऊन देती ढेकर
खळखळ ओढ्याचे गोड पाणी
मावळे गाती रानमाळावर
सांगे वारा कानोकानी….
रायरेश्वराचा शंभू भोळा
सवंगड्याचा जमवून मेळा
मरू वा जिंकू रयतेसाठी
शिवबा बोलती तव शपथेवर
सांगे वारा कानोकानी….
घोडदौड ती सुरू जाहली
पातशाहीला जाग आली
बहुजन प्रतिपालक शिवरायांची
गातो गाणी डफावर
सांगे वारा कानोकानी
आले बाळ शिवनेरी गडावर
सविता धमगाये
नागपूर
=
0
4
8
2
9
0



