0
4
8
3
0
0
भावना जपूया
सद्भावना मनी ठेवून
दुःखितांचे अश्रू पुसुया
शोषित पिडीतांच्याप्रती
सह्रदयी भावना जपुया
देऊन आधार बुडत्याला
दृष्टीहीनांची दृष्टी होऊया
मुक्या बहिऱ्या दुबळ्यांना
नवचैतन्याची सुखे वाटुया
शब्दबाण नको जहरी
आपुलकीचे नाते जपुया
कुकर्माची नकोच संगत
सन्मार्गाची कास धरुया
आदरभाव हा थोरांप्रती
वाणी वाचा मधूर ठेऊया
मित्रत्वाची करुन पारख
सत्याची संगत धरुया
नववर्षाचा करुन संकल्प
तडीस तो नेण्याचे ठरवूया
असंगाशी नको ती संगत
सुविचाराने कर्म करुया
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
3
0
0



