अलिबाग शहरात ‘कराओके’ गाण्यासाठी आता मोक्याचे ठिकाण उपलब्ध
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग शहरात ‘कराओके’ गाण्यासाठी आता मोक्याचे ठिकाण उपलब्ध
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: अलिबाग शहरात जुन्या नगरपालिकेसमोर श्री संतोष ल्हासे यांच्या ” सिंग अलॉंग” या म्युझिक हबचे उदघाटन व्हॉइस ऑफ किशोर श्री. राजु काजे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सुरवातीला सिंगर राजु काजे यांच्या बरोबर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करणाऱ्या सौ. वैशाली जोग यांनी त्यांचा परिचय करून दिला.राजु काजे शासकीय नोकरी सांभाळून कश्याप्रकारे ते गाण्याकडे वळले याबाबतचा प्रवास त्यांनी विशद केला. शहरातील तमाम कलाकारांनी संगीतप्रेमी रसिकानी या वेळी हजेरी लावली.सिंगर राजु काजे यांनी देखील आपल्या सुमधुर आवाजात गाऊन सांगितप्रेमी रसिकांचे कान तृप्त केले.
संतोष ल्हासे हे अलिबाग मधुल प्रख्यात आणि ज्येष्ठ गायक आहेत. कराओके बरोबर इतर छोटया मोठया कार्यक्रमांना उदा. स्टॅंडअप परफॉर्मन्स, इन्स्ट्रुमेंटल क्लासेस या करिता देखील सिंग अलॉंग म्युझिक हब व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे कळले.येणाऱ्या काळातील पावले ओळखून आणि घडामोडीनुसार संगीत क्षेत्रातील कलाकरांना संतोष ल्हासे यांचा हा म्युझिक हबचा प्लॅटफॉर्म नक्कीच उपयोगी पडेल.





