Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील कविता

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : भास आनंदाचा????*
*????बुधवार : ०४/ डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*भास आनंदाचा*

उमलणाऱ्या पाकळ्यांतून,
पसरतो सुवास गंधाचा…
मनास छळून तेव्हा जातो
हलकासा *”भास आनंदाचा”*…१

आठवणी त्या बालपणीच्या,
रूंजी घालतात मनोमनी…
त्या आठवणीने सुखावून,
जीवन जातेय क्षणोक्षणी…२

उघड्या नागड्या पावलांनी,
फिरत असता रानोवनी…
मृदू गवताच्या स्पर्धांमध्ये,
मिळतोय आनंद जीवनी…३

नदीकाठी बसून बघावे,
ते वाहते झुळझुळ पाणी…
त्या पाण्याच्या सुरेल वाणीत,
कानी निनादे मंजूळ गाणी…४

उंच उंच उसळत्या लाटा,
आदळती सागर किनारी…
त्या लाटेच्या तुषारामध्येही,
फुटते आनंदाची चिंगारी…५

हळूच स्पर्शून जातो वारा,
गार गार देह होतो सारा…
*”सुधाकरा”* अलगद कानी,
जातो वदून संगीत धारा…६

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

भाव ,स्पर्श,शब्द ,अर्थ
उमजून हृदयी बसतो
भ्रमाचे गणित न उमजता
उगाच व्याकरणात रमतो

का,कसे , कधी,कुठं, केव्हा
अजूनही प्रश्नात गुरफटतो
भाव वेगळा ,अर्थ वेगळा..
तेव्हा भास आनंदाचा उरतो

मी,माझा,मला ,आमचे
नात्याच्या बंधात आडवे येते
कसला संबंध कुठे उरतो…
तऱ्हा ती दुजेपनाचीओळख होते

बोलण्यात कधी हक्क
कधी मनाचा मोठेपणा
शब्दांनीच पुन्हा विणतो
प्रतीक्षेत ही आपलेपणा

नवरसांचे गुण अवगुण
कमी अधिक रसात रंगतो
जगणं की वागणं…
सोडून देता पुन्हा धरतो

मनाचा हा मानव
हसत रडत अश्रू गाळतो
अजून ही शोधत राहतो
शब्दाच्या शृंगारास भूलतो

हाच आनंदाचा भास की
भ्रमारचे भ्रमण ते…
सुखाच्या सरी होवून जाई
मृगजळच क्षण ते..

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*भास आनंदाचा*

तु जवळ नाहीस पण तुझ्या
मधुर आठवणीचा साज आहे.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भास आनंदाचा जाणवत आहे.||धृ||

वावरते मी फुल बगीच्यात
तिथे तुझा सुगंध दरवळतो
वाटते तु समवेत शत पावली
करत आहे.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भासआनंदाचा जाणवत आहे.||१||

मी चालते गर्दीच्या रस्त्यावर
हात हातात घेऊन सांभाळत तु
वाटते खांद्यावर हात ठेवून
चालत आहे.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भास आनंदाचा जाणवत आहे.||२||

स्वरूप तुझ्या लेकरांच्या
किलबिलात तुझा आवाज
दुमदुमत आहे.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भास आनंदाचा जाणवत आहे.||३||

सागराच्या किनारी लाटांचा
निखळ आवाज, तुझा निस्वार्थ
स्वभाव आठवतो.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भास आनंदाचा जाणवत आहे.||४||

तु जवळ नाहीस पण तुझ्या
आठवणींचा मधूर साज आहे.
भूतकाळातील सोनेरी क्षणात
रममाण होत आहे.
सहचरा प्रत्येक क्षणात तुझा
भास आनंदाचा जाणवत आहे.||५||

*रंजना राहुल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मोर जि गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

भास आनंदाचा देतो
जगण्यास खरी प्रेरणा
वास्तवाचे भान हवे
नको वृथाच कल्पना

क्षण सुखाचा येतो
बरसती आनंद घन
नसे थार्‍यावर जीव
स्वच्छंद बागडे मन

दारिद्र्याचा शाप जिथे
मीठ भाकरीशी गाठ
भास आनंदाचा तिथे
पाय रोवून उभा ताठ

दुःखाची परिसीमा होते
आसवांचा सदा पूर
भास आनंदाचा होता
विवशता होईल दूर

पराजयाच्या सावटाखाली
विजयाचा होतो शंखनाद
भास आनंदाचा तेव्हाच
जागवितो दृढ आशावाद

माझे माझे म्हणताना
निसटतात जेव्हा हात
भास आनंदाचा होईल
ऋणानुबंधाची जुळता गाठ

भास आनंदाचा असावा
आपल्या जीवनाचा भाग
मानापमान नको वल्गना
करावा असूयेचा त्याग

भास आनंदाचा राहो
जगताना आपले आयुष्य
या भासानेच घडेल आपले
उज्ज्वल सारे भविष्य

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*मु.पो.रोहोकडी,*
*ता.जुन्नर, जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

करीत संकटाचा सामना
तो मार्ग सुखाचा शोधतो,
चालतांना अवघड वाटा
तशा त्या तुडवीत जातो…

दुःख,यातना सोसतांना
हृदयात दडवून ठेवतो,
ती स्वप्न उद्याची नव्याने
आशेने मी पाहत राहतो…

हे दिवस निघून जातील
नवे पंख फुटती स्वप्नाना,
तो भास आनंदाचा होतो
अभिलाषा जागवी मना…

वाटते कधी कधी असेही
मृगजळामागे का धावतो?
आभास सुखाचा मजशी
नुसता लपाछपी खेळतो…

ढळू दिला ना तोल कधी
ताबा ना सोडला मनाचा,
दृढ निश्चय पक्का ठरला
समतोल साधला वेळेचा…

स्वप्न साकार होईल उद्या
सुखाचा कवडसा दिसतो,
जणू पंख फुटले स्वप्नांना
भास आनंदाचा सतावतो…

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

टिपूर चांदणं शुभ्र
माळले नील आकाशी
शोभे झोका ढगांचा
लख्ख सुंदर कोजागिरी

चंदेरी छटांचा शशांक
चमकत्या तारकांसह
अवतरला भव्य गगनी
समाधानी लकेर चेहरावरी

ग्रहनक्षत्रांची भरारी नभी
वसुंधरा उत्साही अंतर्मनी
वातावरण भारले उल्लासाने
चराचर डोलले स्वानंदी

शितलप्रकाशी भाऊ चंद्रास
औक्षण केले मनोभावे
स्वप्नी मम भास आनंदाचा
बहिणीला भेटाया आला घरी

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

अश्रू घोटासवे पोटात, लोटतो घास दुःखाचा
उदास मनी सुखावह, वाटतो भास आनंदाचा.//

आवरतोय पसारा, हळव्या भाव भावनांचा
सावरतोय स्वतःला, जरी पाचोळा कामनांचा.//

वावरतोय स्वप्नात, पाहतोय डाव वास्तवाचा
रमतोय कल्पनेत, साहतोय दाह विस्तवाचा..//

दुरावतोय दिवसेंदिवस, क्षण प्रित प्राप्तीचा
सरावतोय हळूहळू, हा विरह जणू सक्तीचा..//

सजवतोय स्वप्न महाल, खेळ राजा राणीचा
जागवतोय अहोरात, काळ आणीबाणीचा..//

काजळतोय पल पल,गर्द काळ्या निराशेचा
उजळतोय अंधूकसा, दिप ह्रदयात आशेचा. //

मावळतेय हर सांज, ध्यास लावून उम्मेदीचा
उगवतेय हर सकाळ, घेऊन भास आनंदाचा..//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

चादर भवती अंधाराची
ध्यास मनास प्रकाशाचा
दु:खाचे काटे खुपताना
सुख देई भास आनंदाचा

क्षितीज रेषा खुणावते
भासची सत्य भासतो
पुढे पुढे चालण्याची
ऊर्जा नित मनास देतो

रखरखत्या वाळवंटी
मृगजळ ही भुलवितसे
शोध त्याचा घेता घेता
सुखस्वप्नची लोभवितसे

नैराश्याच्या तमात जेंव्हा
शोक दाटून येतो ऊरी
भास आनंदाचा वर्षतो
अंगांगावर सुखाच्या सरी

विरह व्यथा मना जाळी
घुसमटतो जीव अंतराळी
दंवबिंदूंची पहाट ओली
हर्षभरी मज कवटाळी

जीवन हा असे आभास
जाण असते ही मनास
आव्हानांना भिडण्यासाठी
पुरे हा आनंदाचा भास

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

“वाटतं आपणच जिकूं,
मग होई भास आनंदाचा ”
“नाही जिकंता आले तर
मग डोंगर उभा दुःखाचा ”

“जिंकण्याची इच्छा असेल
तर सराव करताना होई त्रास ”
“त्रास भोगताना, घाम येऊन
खेळ जिंकल्याचा होई भास ”

“आपली क्षमता किती हे
सराव करताना खरी कळते ”
“अथक परिश्रमाने, कष्टाने
आनंदाला भरती येत राहते ”

“आयुष्याच्या या पटलावर
कधी सुख कधी दुःख येते ”
“दुःखाच्या ओहोटीनंतर
आनंदाला भरती येत असते ”

“ऊन सावलीच्या या खेळात
श्रावणसरीचा पाऊस येतो ”
“आता चिंब भिजणार म्हणून
आनंदाचा भास मनी होतो ”

*श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

तू मृगजळ तप्त
मी निष्पाप हरिणी
तू लाट समुद्राची
मी निष्प्रभ धरणी

तू विशाल आकाश
मी टीमटीमता तारा
तू गराडा चक्रिवादळाचा
मी गतप्राण किनारा

तू तांडव वणव्याचा
मी होरपळलेला प्राण
तू बेछूट बर्फवर्षा
मी गोठलेला त्राण

तू ढगफुटी वादळासवे
मी डगमगणारी नाव
तू हिमालय गर्वाचा
मी वेदनांचा गाव

तू श्वास प्राणांचा
मी तडफडता मासा
तू सिंहगर्जना भयानक
मी भित्रा ससा

तू पाबंद न वेळेचा
मी क्षण विरहाचा
तू उद्छाद जगण्याचा
मी चेहरा निराशेचा

तू नसानसात माझ्या
मी बिंदू मोहाचा
तू भास आनंदाचा
मी कळस कल्पनेचा

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे