मंगेश जनबंधू यांची डॉक्युमेंट्री राज्यात उत्तम दहामध्ये
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश जनबंधू यांची डॉक्युमेंट्री राज्यात उत्तम दहामध्ये
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर( दि ३) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र यांनी राज्यभरातील शिक्षकांच्या कलागुणांना चालना मिळावी व त्यातून कौशल्य विकसित व्हावे याकरिता राज्यभरातील शिक्षक व कर्मचारी यांच्याकरिता विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.
भिवापूर येथील गर्ल्स हायस्कूल मधील शिक्षक मंगेश जनबंधू यांच्या डॉक्युमेंट्री ची निवड आता राज्यावर करण्यात आली आहे.
राज्यभरातील सर्व तालुक्यांमधून ४३० डॉक्युमेंट्री स्पर्धक सहभागी झाले असून दिलेले विषय व त्यास अनुरूप अश्या निवडक ४० ची निवड विभागातून करण्यात आली. राज्यस्तरावर त्यातून १० उत्कृष्ट डॉक्युमेंट्री अंतिम विजेते म्हणून निवडण्यात आले, ज्यात नागपूर विभागातून भिवापूर तालुक्यातील मंगेश जनबंधू यांच्या डॉक्युमेंट्रीचा समावेश आहे.
दिलेल्या विषयांपैकी “शिक्षण आणि शिक्षक” हा विषय घेत “शिक्षण बदलतंय..?” या शीर्षकाखाली त्यांनी माहितीपट तयार केलेला आहे. या माहितीपटात सध्याच्या शिक्षण पद्धतीचे वास्तव मांडले गेले आहे.
मंगेश जनबंधू यांच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेश हुलके, संस्थेच्या सचिव भाग्यश्री समर्थ, भिवापूरचे गट शिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी ऋग्वेद भंडारकर व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



