Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि ५ रायगड): शनिवार दि. ४ अॉक्टोबर २०२५ रोजी पी. एन. पी. शाळा वेश्वी येथे तालुकास्तरीय शालेय मुलींची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १७ वर्षा खालील मुलींच्या गटात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या मुलींच्या संघाने नेत्रदिपक खेळ करून प्रथम क्रमांक पटकाविला.

१७ वर्षा खालील मुलींचा कबड्डी संघ खालील प्रमाणे-“

१) श्रेया विलास म्हात्रे, इ.११ वी
२) लक्ष्मी ओमप्रकाश थापा, इ. १० वी
३) मनिषा ओमकार थापा, इ.९ वी
४) वंशिका विनोद पाटील, इ.८ वी
५) तपस्या रविंद्र वाघ, इ. ११ वी
६) समिक्षा गजानन पाटील, इ.९ वी
७) प्रिया सचिन शहा, इ.१२ वी
८) मीरा मंगेश पाटील, इ. ८ वी
९) गायत्री रामकरण राजभर, इ. ९ वी

सदर संघ जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अलिबाग तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. ह्या सर्व विद्यार्थीनींना स्पर्धेसाठी गणेश राणे सर, विशाल पाटील सर, प्रियंका राणे मॕडम व शतदा राऊत मॕडम यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे