बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*🥀विषय : जनसंवाद*🥀
*🍂बुधवार : २५ / जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*जनसंवाद*
विकासाच्या दृष्टीने
मुद्दा तो देश हिताचा
साधावा जनसंवाद
शासन आणि प्रजेचा
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*जनसंवाद*
निरंतरपणे कामे असून
आई जनसंवाद ठेवतसे,
आदानप्रदान करुन खरं
ज्ञानज्योत तेवत ठेवतसे.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*जनसंवाद…*
समाजात वावरायचेचं तर
जनसंवाद करावा लागेल
एकमेकांची मतं कळता
जनसमुदाय हितार्थ वागेल…
*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जनसंवाद*
जनसंवाद रोज साधलाअसता
भल्याबुऱ्या बातम्या समजतात
जनसंपर्कासाठी पूर्वी पारावर जमायचे
सहभागी व्हायचे एकमेकांच्या सुखदुःखात
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*जनसंवाद*
जनसंवाद गरजेचा लोकशाही वाढीसाठी
प्रश्न सुटावेत लोकांचे चुटकीसरशी
नेतेमंडळींनी झटावे लोकांच्या हितासाठी
प्रामाणिक राहावे कायम देशाशी
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*तालुका नेवासा*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*जनसंवाद*
नको कोणता ध्यास
आपुलकीचा अभ्यास
टाळावा वाद विवाद
फक्त भक्ती जनसंवाद…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*जनसंवाद*
संवाद ठरतोय आता औपचारिक
अनौपचारिक जनसंवादाचा संपला काळ
नोकरी व्यवसाय मोबाईलच्या दुनियेत
जनसंवादाच्या वेळेचा जमेना ताळ
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
*चारोळी… जनसंवाद*
सकारात्मक जनसंवाद आहे
लोकशाहीचा मुख्य आधार
योजनाच्या योग्य अंमलबजावणीत
हवा रसातळातील लोकांचा विचार
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿〽️✍️〽️➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



