0
4
8
2
9
0
विसंगती
बघावे जिकडे तिकडे पाहिले
डेटिंग पेन्टिंगनी सजवलेली
रोडवरील कितीतरी शौचालये
अगणित लक्षवेधी ही इमारते
पण विसंगती बघा कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या इमारतीची
टिनाचे छप्पर उडे एकाक्षणी
वादळी वार्यानी उडते कशी
तरी सरकार खर्च करती
नको त्या ठिकाणी पोकळ
ठसा नावाचा उमटविती
स्वच्छ भारत भिंतीवरती
आताच एक टिव्हीवर सर्वानी
बघितले असावा तो व्हिडिओ
झाले बघा काळजाचे पाणी
कशी ही भयानक अनुभूती
या भारतीय कृषी प्रधान देशात
बघा शेतकर्यांची शोकांतिका
वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात
हाताने थांबवित वाहत्य धान्याला
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
=========
0
4
8
2
9
0



