Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

शब्दांच्या पलीकडले नाते

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर सर

0 4 8 2 9 4

शब्दांच्या पलीकडले नाते

माझे सहकारी मित्र शिक्षक श्री. शाहू दिंगबर जाधव सर दिनांक 21 जून 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीबद्दलचा कार्यक्रम जयराम विद्यालय, नारंगवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

भारत विद्यालयाची ती माती, तीच होती दोघांची वाट,
१९९५ ते २००१, सहवासात घडली निखळ साथ…
शाळेच्या दारात नव्हे, ती ओळख मनात वसली,
मित्राच्या रूपात ‘भावा’ची सावली लाभली…

सकाळची शाळा, चर्चा अभ्यासाची,
आणि संध्याकाळी सहवेदनेची साथ माणुसकीची…
कधी मी हरवलो, थकलो, अडकलो काही दुःखांत,
तेव्हा ‘शाहू सर’ बनले आधार, विश्वासाच्या संगांत…

त्या दिवसांची आता आठवण गहिवरते,
मनाच्या पाटीवर त्यांची माया शब्दांत उतरते…
३१ मे २०२५ सेवानिवृत्तीचा तो दिवस आला,
पण त्यांच्या आठवणींनी पुन्हा शाळेचा दरवाजा वाजवला…

कार्याचा शेवट, पण नात्याचा नाही,
शब्द अपुरे, पण मन भरून येते काही…
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हेच मन:पूर्वक गाणं,
आरोग्य, आनंद, आणि समाधान लाभो, हीच सद्गुरू उज्वलानंद महाराजांच्या चरणी प्रार्थना अनंतप्रमाणं…

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर सर
भारत विद्यालय बेडगा
ता उमरगा जिल्हा धाराशिव
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे