
0
6
3
0
9
4
हा भारत आहे
हा भारत आहे
शांतीमय देश आहे
नांदतो समता बंधुता
इथे बुद्धाचा वास आहे
हिमालयाची उंच शिखरे
ती संरक्षणाची आहे फळी
शत्रूंचा नाही शिरकावं
म्हणून फुलतो सुंदर कळी
भारत संस्कृतींमय देश
बरेच आहेत विद्वान
बाबा साहेब विश्वरत्न
वाढत आहे भारताची शान
प्रज्ञाशील करुणेने ईथे
वाहतो शांतीचा निर्मळ झरा
सत्य अहिंसा बापूचा संदेश
यानेच मिळतो जीवनाला किनारा
निसर्गमय सौंदर्याने नटलेला
माझा महान भारत आहे
विविध भाषा विविध संस्कृती
साधू संतांची खाण आहे
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
6
3
0
9
4



