आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
ज्ञानेश्वर व हरी गुरुजी एक स्नेहगंधी सत्त्वकथा
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0
3
3
5
1
6
ज्ञानेश्वर व हरी गुरुजी
एक स्नेहगंधी सत्त्वकथा
“खांद्यावर हात, मनात विश्वास,
मैत्रीची ही जोड, समाजासाठी खास।”
पांढऱ्या शुभ्र वस्त्रात तेजाचं रूप,
स्नेह, सेवा आणि कार्यशील झुप।
ज्ञानेश्वर – गोडवा, शांतीचा गंध,
हरी गुरुजी – शिस्त, कर्तव्याचा छंद।
हसऱ्या चेहऱ्यावरून वाहे आत्मीयता,
मनात असे जनतेची खरी आपुलकीता।
बालकांच्या डोळ्यात स्वप्न रोवणारे,
वृद्धांच्या वेदनांवर प्रेमाचे फुंकर घालणारे।
“हे नातं नाही केवळ खांद्याचं,
हे नातं आहे माणुसकीच्या ध्येयाचं!”
जिथे जातात तिथे उमटते शांतीची चाहूल,
माणसात माणूस शोधणारा त्यांचा मूलमंत्र अनमोल।
ज्ञानेश्वर व हरी गुरुजी — एक आदर्श, एक प्रेरणा,
ज्यांनी समाजसेवेची दिली जगाला नवी व्याख्या।
“एक दिशा, एक ध्यास,
माणुसकीचाच ठेवा घेऊन चालले खास!”
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
0
3
3
5
1
6