
0
6
3
3
1
1
लाडका बाप्पा आला
ढोल ताशांचा गजर करुया
आपला लाडका बाप्पा आला
फुलं नि गुलाल उधळूया
माझ्या घरी मोरया आला…!!
दारी रांगोळी तोरणं मखर
पाटावर मूर्ती हळूवार मांडली
दुर्वा वाहिली फुलं वाहिली
गणरायाने घराची शोभा वाढली..!!
मोदक नैवेद्य लाडूची थाळी
पेढे बर्फीचा नैवेद्य बाप्पाला
फक्त दहा दिवस गणराया
जणुकाय हो पाहुणा आला…!!
इडा पिडा जावो सुखकर्त्या
लाभो सुख बळीराजाला
पिकं डोलू दे मोत्यावानी
हात जोडूनी मागते बाप्पाला…!!
दहा दिवसांनी बाप्पा जाणार
माझ्या हृदयी नित्य वास करी
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती
राहो अखंड माया सर्व विश्वावरती..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
6
3
3
1
1



