Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

शिक्षक म्हणून आपली जबाबदारी

वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा - पुणे

0 4 8 2 8 6

शिक्षक म्हणून आपली जबाबदारी

1)आपल्या वर्गात आलेले मुल हे खूपच लहान असते इयत्ता पहिली वय वर्ष 6 फक्त. अशावेळी मुलांकडे विविध वस्तू असतात. डबा, पाण्याची बाटली, विविधरंगी पेन्सिल्स , रबर,पाटी इत्यादी छान, छान वस्तू असतात. पहिलीतल्या मुलांना वस्तूंचे अट्रॅक्शन मात्र असते. आपल्याकडे जी वस्तू नाही ती इतर मुलांकडे आहे म्हटल्यानंतर कदाचित ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. वस्तू जर का त्यांना घेतली तर आपण त्याला चोर म्हणून समजू नये. त्या वस्तूचा अट्रॅक्शन असल्यामुळे तो तसा वागलेला असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कोणाची वस्तू घेऊ नये हे मूल्य रुजवण्यासाठी आपण काही बोधपर गोष्टींचा वापर येथे करावा. मूल्य संस्कारांच्या गोष्टी सांगाव्यात. कोणी कोणाची वस्तू घेतली तर आपण ती वस्तू परत करायला सांगावे.

2) वर्गात येणाऱ्या सहा वर्षाच्या या मुलाला ओळ म्हणजे काय आणि आपल्या वस्तू कुठे नीट ठेवाव्यात हे समजत नाही. पहिला महिना याच्यातच जातो मुलांना ओळीत बसवणे आणि त्यांच्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवायला लावणे. अशावेळी मुलांच्या कृतीला वाव देऊन शिक्षकांमध्ये संयम असायला हवा. शिक्षक सहनशील, संयमी असतातच. पण तरीही लहान मुलं असतात त्यांना सांभाळून घ्यावे लागते.

3) विद्यार्थ्यांनी चुका केल्या तरी त्या विद्यार्थ्याला नाउमेद मात्र करू नये. तुला काही समजत नाही.तुला काही येत नाही, असे सतत म्हणू नये. चुकलेल्या गोष्टींना सुधारायचे कसे हे समजून सांगावे. झालेल्या चुका सांगाव्यात पण त्या सांगण्याची पद्धत वेगळी असावी. जेणेकरून आपले मूल,आपला विद्यार्थी पुढे येऊन,प्रेरणा घेऊन परत ती कृती अतिशय उत्तम पद्धतीने करेल. मग विद्यार्थी चुकला तरी त्याला शाब्बासकी द्यावी. पण शाब्बासकी देताना त्याचे चुकले कुठे हे मात्र समजून सांगावे. ” बाळा आपल्याला असे करायचे होते, असे नव्हते. आपण असं करूया का चल आपण हे करूया. ” अशा शब्दात त्याला सांगावे.

4) शिक्षकाच्या कोणत्याही कृतीला,अध्यपनाला प्रथम सर्व विद्यार्थी योग्य प्रतिसाद देतीलच असे मात्र नाही. योग्य प्रतिसादाची अपेक्षा मात्र बाळगू नये. आपली कृती मात्र करतच राहावी. हळूहळू योग्य प्रतिसाद यायला सुरुवात होईल. आणि हा प्रतिसाद कसा येतो तर मुलांना आवडलं की प्रतिसाद येतो. अशावेळी मुले शांत बसत नाहीत.” बाई छान,मस्त आम्हाला समजलं ” अशा शब्दात बोलतात. पटकन शाबासकी देऊन जातात. हो, शाबासकीच बर! लहान मुले पटकन बोलून रिकामी होतात.

5) शिकवताना खूप मोठी वाक्य लांबलचक आणि गुंतागुंतीची वाक्य शक्यतो वापरू नयेत. लहान मुलं असतात त्यांना दोन शब्दांचा,तीन शब्दांचा,चार शब्दांचे वाक्य वापरावे.
छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करावी.
उदा – आई आली.
बाबा बघा.
काका चल.
कमळ फुलले.
आई कमळ बघ.
बाबा खाऊ आणा.

6) मुलांच्या छोट्या छोट्या कृतींचे निरीक्षण करावे. त्यांना काय काय आवडते हे पहावे. आणि तसे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या आवडीनुसार मुलांना शिकवले असता मुलं लवकर शिकतात. मुलांच्या आवडीनुसार, मुडनुसार कोणतीही कृती शिक्षकाने शिकवली तर मुले खूप लवकर शिकतात.

7) प्रत्येक मुलाच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या तर आपल्याच मुलाची प्रगती नेमकी कुठे आहे हे आपल्याला समजते. आणि मुलांच्या ज्या क्षमता प्राप्त नाहीत त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी या नोंदिंचा योग्य तो उपयोग होतो.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा – पुणे
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे