Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूर

निराधार व सर्व सामान्यांसाठी सोयी सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्मितीचा संकल्प- डॉ.रवी गिऱ्हे

आसमान फाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्साहात संपन्न

0 5 1 8 0 3

निराधार व सर्व सामान्यांसाठी सोयी सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्मितीचा संकल्प- डॉ.रवी गिऱ्हे

आसमान फाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्साहात संपन्न

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि २६) आसमान फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका निधी तेलगोटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

इतर पाहुण्यांमध्ये प्रज्वल भोयर सुप्रसिद्ध व्यावसायिक व नाट्य अभिनेता, डॉ. सदानंद थोते सुप्रसिद्ध चिकित्सक, दर्पण भोयर, अध्यक्ष डॉ रवि गि-हे, सचिव नरेश शेंडे उपस्थित होते. दिप प्रज्वलनानंतर मधुरा कोलारकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटन कौशल्यावर प्रकाश टाकला.

डॉ. रवि गिऱ्हे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लवकरच गरीब, निराधार तसेच तथा जनसामान्यांसाठी सर्व सुविधा युक्त वृध्दाश्रम ग्रामीण भागात शुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. जनसहयोगतून याची निर्मिती करताना रोजगाराच्या संधी ही निर्माण केल्या जातील. या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.

कार्यक्रमांचे संचालन सहसचिव विभा विंचुरकर यांनी तर आभार डॉ. साधना थोते यांनी मानले. याप्रसंगी अनेक गणमान्य नागरिक व संस्थेचे सदस्य उपस्थित होते. ज्यात सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य नरेंद्र विंचुरकर, भास्कर मुलताईकर, दिनेश टेकाडे, प्रमोद हेडाऊ, सुधीर थोते, धनंजय दहासहस्र सह आसमान महिला क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मेघा गि-हे उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 8 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे