Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननाशिकमहाराष्ट्रसाहित्यगंध

विंचूरचे कवी शैलेश गायकवाड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

बिनधास्त प्रतिनिधी

0 5 9 4 1 4

विंचूरचे कवी शैलेश गायकवाड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नाशिक/ विंचूर : विंचूर येथील कवी शैलेश शिवाजीराव गायकवाड यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना कोल्हापूर येथे प्राप्त झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट २०२६ रोजी लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि. लासलगाव येथे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.चे अध्यक्ष श्री. नानासाहेब दत्ताजी पाटील यांच्या हस्तेही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी खासदार व आमदार दिवंगत डॉ. श्री. वसंतरावजी पवार साहेब यांच्या सुकन्या, नाशिक गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षा तथा येवला-लासलगाव मतदारसंघाच्या भाजपा प्रमुख मा. अमृताताई वसंतराव पवार यांच्या शुभहस्ते कवी शैलेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

कवी शैलेश गायकवाड हे मराठी व हिंदी भाषेत सातत्याने लेखन करणारे साहित्यिक असून बालकाव्य, कविता, अभंग आणि संतसाहित्य या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. या सन्मान सोहळ्याप्रसंगी वाहेगाव दहेगावचे माजी सरपंच व बँकेचे संचालक श्री. दशरथजी आहेर, बालमित्र बँकेचे संचालक श्री. संदीपजी माणिक देरेकर तसेच भाजपा युवा नेते श्री. निलेश भाऊ सालकांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कवी शैलेश गायकवाड यांच्या या गौरवाबद्दल साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विंचूरच्या साहित्य क्षेत्राचा लौकिक वाढविणाऱ्या या सन्मानामुळे विंचूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शैलेश गायकवाड हे ‘मराठीचे शिलेदार’ संस्था नागपूरचे प्रसिद्ध कवी सभासद आहेत.
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे