
0
4
8
2
8
6
गारवा
लाल कौलांचा निवारा
खेड्यातील घर दिसे दुरून
बळकट भिंती लिंपल्या भूवर
अंगणी तुळस वृंदावन
डवरल्या कृष्ण मंजिरा
काटेरी उंच कुंपण परिसर
धष्ठ-पुष्ठ गाईगुरांचा गोठा
आम्रवृक्ष सावलीत झुले झोका
चिमुरडी बालके जाती उंचावर
कष्टमय जगते जीवन
साऱ्यांची आवडती जननी
गाली खळी हास्य मुद्रेवर
वाट पाहणारी जिवलग
संगीनीचा साऱ्यात घुमतोय
माया ममतेचा गारवा अलवार
सुनीता पाटील
जिल्हा अहिल्यानगर
========
0
4
8
2
8
6



