Breaking
आरोग्य व शिक्षणगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

बचत भवन येथे ‘शाळा पूर्व तयारी’ नियोजन सभा संपन्न

0 4 8 2 9 7

बचत भवन येथे ‘शाळा पूर्व तयारी’ नियोजन सभा संपन्न

अर्जुनी मोरगाव: आगामी शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या अनुषंगाने शाळा पूर्वतयारी नियोजन संदर्भाने ,जिल्हा परिषद व्यवस्थापन अंतर्गत कार्यरत मुख्याध्यापकांची शाळा पूर्वतयारी नियोजन सभा पंचायत समिती अर्जुनी /मोर च्या सभापती सविताताई कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन अर्जुनी/ मोरगाव येथील सभागृहात संपन्न झाली.

सदर सभेत शाळा पूर्व तयारी नियोजन संदर्भाने गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी शालेय रंगरंगोटी, शालेय स्वच्छता, नवागतांचे स्वागत, मुख्याध्यापकांची जबाबदारी व कर्तव्य, शालेय नियोजन व मुख्याध्यापक नियोजन यांचे गुणवत्ता विकासासाठी असलेली उपयुक्तता , संविधान कलमांचे वाचन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५, परसबागेची लागवड इत्यादी जवळपास ३५ विषयांवर चर्चा करून सदर विषयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले .

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पंचायत समिती अर्जुनी/ मोरचे उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी शाळा पूर्व तयारी व गुणवत्ता विकास साधण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नरत रहावे व राष्ट्र विकासाला हातभार लावावा असे आवाहन केले. तसेच खंडविकास अधिकारी शंकर वैद्य यांनी सुद्धा सभेला संबोधित करून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळा विकासाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी संबंधित ग्रामसेवकांना योग्य ते निर्देश देणार असल्याचे सांगितले त्यासाठी गुणवत्ता विकासासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विस्तार अधिकारी बेनीराम भानारकर व १५ ही केंद्रातील मुख्याध्यापक आवर्जून उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन अर्जुनी मोरगावचे केंद्रप्रमुख सु.मो .भैसारे यांनी केले तर उपस्थिताचे आभार गट गटसमन्वयक सत्यवान शहारे यांनी केले. शेवटी सभेची सांगता वंदे- मातरम गीताने करून आगामी नवीन शैक्षणिक वर्षांच्या समस्त मुख्याध्यापकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे