ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध
मी गणित वेडा शिक्षक
डॉ ज्ञानेश्वर गुरलिंगप्पा माशाळकर जिल्हा धाराशिव
0
4
8
2
8
4
मी गणित वेडा शिक्षक
मी गणित वेडा शिक्षक आहे,
फक्त आकड्यांचा नाही
मुलांच्या स्वप्नांचा हिशोब करणारा…
चिखलवाटेवरून शाळेकडे चालताना,
हातात पुस्तक, मनात आशा घेऊन
ग्रामीण लेकरांच्या डोळ्यात
उजेड पेटवणारा दिवा आहे मी…
तीस वर्षे वहीपेक्षा
अधिक मी मन उघडली,
भीतीला समज दिली
आणि गणिताला माणुसकी शिकवली…
अपयशाच्या पाटीवर
विश्वासाची रेघ ओढली,
“मला येत नाही” म्हणणाऱ्यांना
“मी करू शकतो” इथपर्यंत आणलं…
आज विद्यार्थी मोठे झाले,
पण त्यांच्या यशात
माझ्या खडूच्या धुळीत
माझ्या आयुष्याचा अर्थ दिसतो…
मी गणित वेडा शिक्षक आहे,
म्हणूनच आजही उत्तर सापडत नाही
डॉ ज्ञानेश्वर गुरलिंगप्पा माशाळकर
जिल्हा धाराशिव
0
4
8
2
8
4



