न्यु मून महाविद्यालयात ‘सायबर गुन्हे व सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
न्यु मून महाविद्यालयात ‘सायबर गुन्हे व सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
क्विक हिल फाउंडेशनचे कार्यप्रमुख हर्षल बोरकर यांनी दिली माहिती
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
अर्जुनी / मोरगाव : सायबर क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण नकळत सायबरच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे सायबर क्राईमबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज असल्याने न्यु मून महाविद्यालयात “सायबर गुन्हे व सुरक्षा” या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा प्रा.राकेश उंदीरवाडे, प्रा.तारका रूखमोडे, अध्यापिका त्रिवेणी थेर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
‘क्विक हिल फाउंडेशनच्या’ सहयोगाने ही कार्यशाळा घेण्यात आली. क्विक हिल फाउंडेशनचे कार्यप्रमुख हर्षल बोरकर यांनी सायबर क्राईम विषयी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. ते म्हणाले की आपल्याकडून कळत- नकळत सायबर चुका होत असतात.या चुका आपल्याला शारीरिक ,मानसिक व आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकतात .या जाळ्यातून आपण बाहेर कसे पडायचे हे पटकन समजत नाही.आजच्या युगात इंटरनेट सेवा ही अत्यंत आवश्यक व गरजेची झालेली आहे ,परंतु या सेवेचा लाभ घेताना प्रत्येकाला अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. नकळत यातून सायबर क्राईमच्या जाळ्यात आपण ओढले जात आहोत. या इंटरनेटच्या जाळ्यात आपण स्वतः किती सुरक्षित आहोत?
त्यांनी व्हाटस ॳॅप, फेसबुक व तत्सम सोशल नेटवर्किंग साइट्स वापरताना विद्यार्थी व पालकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्यवस्थेत समाज माध्यमांचा वापर सकारात्मक पद्धतीने करावा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सायबर गुन्हा कशा पद्धतीने घडू शकतो, समाज माध्यमांना आपण कशा पद्धतीने हाताळत आहोत आणि आपण कशे जागरूक राहिले पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले .यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे कार्यप्रवक्त्याकडून मिळवत सायबर क्राईमविषयी आपल्या शंका दूर केल्या. विद्यार्थ्यांना खरंच अशाप्रकारच्या मार्ग दर्शनाची आज गरज आहे,जेणेकरून कुठलाही गुन्हा त्यांच्या हातून घडणार नाही व नवीन पिढी सतर्क होईल.