प्रदीप विघ्ने राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघाचे आयोजन
प्रदीप विघ्ने राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित
मोहपा : महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघ द्वारा अभियंता भवन, अमरावती येथे आयोजित “राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता पुरस्कार सोहळा – २०२४ संपन्न झाला.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सुजाता गौरखेडे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, मुख्य अतिथी पद्मश्री शंचरबाबा पापळकर अनाथांचे नाथ प्रवर्तक वझ्झर मॉडल, प्रमुख उपस्थिती डॉ. गोविंद कासट लेखक व ज्येष्ठ समाजसेवक,गुंजन गो॓ळे सामाजिक कार्यकर्त्या, अजय ढाकुलकर पीएसआय डॉ.चंचल गजभिये,अजय राऊत समाज- सेवक यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळयात पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोहपा येथील शिक्षक,कवी प्रदीप नारायणराव विघ्ने यांना शैक्षणिक,सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यक्रम अध्यक्षा प्रा.डाॅ.सुजाता गौरखेडे यांचे हस्ते “राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान
पुरस्कार – २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मापत्र शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर,सूत्रसंचालन शीतल माहुरे यांनी केले.तर आभार पंकज थोरात यांनी मानले. प्रदीप विघ्ने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल न.प.माजी अध्यक्ष इमेश्वर यावलकर, शोभा कऊटकर, उपाध्यक्ष श्रीधर गणोरकर,नगर- सेवक भैय्याजी नारनवरे, श्रीकांत येणूरकर, संजय देशमुख, राजेश नेरकर,प्रशासन अधिकारी अर्चना टालाटुले,केंद्रप्रमुख डाॅ.किर्ती पालटकर,मनोहर रंगारी,रमेश सालोडकर,नरेश भैसवार माजी प्राचार्य अरूण सोमकुवर,प्रकाश आदमने मुख्याध्यापक समसुद्दीन शेख,विजय चिमोटे, मोहन चतूर,त्र्यंबक राऊत, स्वाती हिरटकर, अँड सागर कऊटकर, अँड हर्षल यावलकर, डॉ.प्रमोद वडते,डाॅ.विनोद भालेराव, प्रा.कुंदन सूर्यवंशी,प्रा.विवेक देशमुख,प्रा.अरूणा डांगोरे,राजू देशमुख संजय गणोरकर,अकबर कुरेशी, विलास तिबुडे, वर्षा डांगोरे,धर्मराज डोंगरे शाळेतील शिक्षक,शिक्षिका व मित्रमंडळी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.