
0
5
5
8
5
6
अबोल प्रीत मनातली
अबोल प्रीत मनातली
निसर्ग सौंदर्य दृश्य टिपता
डोळ्यातले पारणे फिटले
नकळत प्रीत मनातले उमलता
स्नेह बंद काळजात रूचला
हसऱ्या डोळ्यातून दिसती
तुझा लोचनी जीव माझा
हळुवार भावना समजती
नको चंद्र तारे फुलांचे पिसारे
साथ हवी स्वच्छंदी प्रेमाची
समजून घेऊया एकमेकांना
गुजगोष्टी करू आनंदी जीवनाची
अबोल प्रीत मनातली
आठवण झाली तुझ्या प्रेमाची
नको खेळ आता शब्दांचा
बोलकी भावना तुझ्या डोळ्याची
प्रीतीचा आता विरह साहवेना
तुझ्या वाचून मज करमेना
जीव तुझ्यातच गुंतला
ठेव साठवून ठाव मना
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=======
0
5
5
8
5
6



