Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

जि प उच्च प्रा.शाळा तारसा येथे “शाळा प्रवेशोत्सव- पहिलं पाऊल” सोहळा थाटामाटात साजरा!

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

0 4 8 2 8 7

जि प उच्च प्रा.शाळा तारसा येथे “शाळा प्रवेशोत्सव- पहिलं पाऊल” सोहळा थाटामाटात साजरा!

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर/ मौदा: जिल्ह्यात दि. २३ सोमवार पासून नवीन शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात झाली. शाळेची इमारत इवल्या विद्यार्थ्यांच्या पावलांनी जागी झाली व परिसर पुन्हा गजबजून गेला. यंदा “शाळा प्रवेशोत्सव – पहिलं पाऊल “या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रथम दिवशी पहिल्या वर्गातील मुलांचे पायाचे ठसे उमटवून त्याची प्रत पालकांना भेट दिली व शाळेत सुद्धा जतन करून ठेवण्यात आली.

तसेच गुलाब पुष्प देऊन पहिल्या वर्गातील मुलांचे स्वागत करण्यात आले व सेल्फी पॉईंट मध्ये नवागतांची सेल्फी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, फुलझाड ,पाठ्यपुस्तक, बुटमोजे व गणवेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी तारसा गावाचे सरपंच सौ. वैशालीताई लेंडे, उपसरपंच श्री. चंद्रशेखरजी गभणे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. कृष्णा मोटघरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. शालिनीताई देशमुख व अंगणवाडी सेविका,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सचिन मुंगाटे व इतर सदस्य, पालक मान्यवर उपस्थित होते. केंद्रप्रमुख श्री अनिल पत्रे यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कु .सायली शेंडे, कु. चित्रा थोटे,सौ.प्रियांका पाटील,कु. सोनाली मते यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे