शिवसेवक प्रतिष्ठानतर्फे ‘वसुधा नाईक’ यांच्यासह आठ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
शिवसेवक प्रतिष्ठानतर्फे ‘वसुधा नाईक’ यांच्यासह आठ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
पुणे: ( दि. 8डिसे): शहरातील कर्तृत्ववान नऊ रणरागिणीना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. खरंतर शिवप्रताप दिन 10 नोव्हेंबरला साजरा करतात, पण आपण हिंदुस्थानात आहोत आणि येणाऱ्या पिढीला हिंदू तिथी तथा रीतीरिवाजाचे प्रश्न पडू नये म्हणून शिवसेवक प्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्यावतीने शिवप्रताप दिन आज मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1946 रोजी “आदर्श नारी पुरस्कार 1946” तसेच शिवसेवक प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधले.
गड किल्ले, गड संवर्धन तसेच सामाजिक कार्य म्हटलं की अनेक कार्य आहेत. या क्षेत्रात देखील बऱ्याच रणरागिणी पुरुषापेक्षाही दोन पावले पुढे कार्यतत्पर असतात… खरं दुर्गवेडे आणि शिवरायांचे एकनिष्ठ मावळे काय ते या “शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान” यांचे कार्य ऐकून समजते.
आज शिवरायांच्या मावळ प्रांतातील रणरागिणी दीपाऊ आऊसाहेब बांदल(देशमुख) यांच्या वंशज सौ.राजश्री बांदल(देशमुख)- घोरडे यांना जवळून ऐकायला मिळाले आणि प्रत्यक्ष दिपाऊ आऊसाहेबांचे सानिध्य जाणवले. तसेच, रणरागिणी सौ.नलावडे ताई यांचं गडकोटवरील नितांत प्रेम व शिवरायांबद्दल कमालीचा आदर जाणवला, म्हणूनच कदाचित आयुष्याचा जोडीदार जोडला गेला, तोही दुर्गवेडा अन शिवविचाराने प्रेरितच.
नऊ रणरागिणीमध्ये सौ.वसुधा नाईक, कु.शिवसावली, कु. कल्याणी, सौ. सुजाता सातव, सौ.सारिका इंगळे, कु.नम्रता मोटे बाल-गिर्यारोहक कु. मुद्रा तसेंच सुरेल गळ्याच्या उभरत्या गायिका कु.निकिता – अवंतिका यांचा समावेश असून या भगिनीसह सर्वांचा प्रवास, समाजकार्य जवळून अनुभवायला मिळाले.
या सर्वांची सांगड शिवसेवक प्रतिष्ठानची रणरागिणी कु. सुचेता भिसे हिने घडवून आणली आणि संपूर्ण कार्यक्रमांची आखणी, सूत्रसंचालन कविवर्य व शिवव्याख्याते श्री. गजानन उफाडे या मान्यवरांनी केले त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आजच्या कार्यक्रमात सामाजिक कार्य हे उतार वयात सुरु न करता,आवर्जून तारुण्याच्या उंबराठ्यावर सुरु करावे असे जाणवले…!!! नव्या पिढीच्या या उमद्या मावळ्यांना भेटून नक्कीच प्रेरणा मिळाली.



