कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सलतयं ना?; वर्षा मोटे

0
4
0
9
0
3
सलतंय नां?
मनाच्या गाभाऱ्यात
साचलय खूप काही
दाटलेल्या ढगापरी
मुक्त कोसळू पाही….
दुःख माझे जाणणारे
आपलेच जेव्हा दुरावले
माझ्या दुःखी मनाला
मीच आता सावरले….
दुःख कोरड्या नयनातले
जगाला कुठे दिसते..?
जवळचे ही आप्तगण
मज अपरिचित वाटते….
ओठावरच्या हास्यात
वेदनेला मी लपवते
चेहऱ्यावर चे भाव
पिल्लांसाठी मिटवते…..
जुन्या त्या आठवणीने
डोळे डबडब भरतात
न ओघळताच अश्रूं
डोळ्यांतच मुरतात….
कोलमडलेलं आयुष्यं
धीराने उभारू पाहते
दुःखाचा वाटेकरी
गर्दीत शोधू पाहते….
अव्यक्त मन माझं
आतल्या आत गुदमरते
सलणार दुःख माझं
आतल्या आत पचवते
कुणीतरी हवे असे
समजून उमजून घ्यावे ना!
मी उगाच मौनात नसते
उरात सल सलतंय ना…?
उरात सल सलतय ना..?
वर्षा मोटे पंडीत
छ.संभाजी नगर
=========
0
4
0
9
0
3





