
0
4
0
9
0
3
स्वातंत्र्यातील गुलामी
सध्याच्या युगात दिसतात,
पती-पत्नी दोघे नोकरदार,
गरजा भागवण्या त्यांच्या
करतात कुठलाही रोजगार.
वेळ नसतो मुलाबाळांना,
घराकडे लक्ष राहत नाही,
पालकही दुर्लक्षित म्हणून
नातेसंबंध ढासळले काही.
वाढले वृद्धाश्रम अतोनात,
संस्कृतीचे झाले अध:पतन,
संस्कार हरवले नातवंडांचे
उरला केवळ उपहासजन.
समृद्ध करूया खेडी,
नको लाचारीचा घाट,
मिळालेला हा जन्म,
नका धरू बेकारीची वाट.
स्वातंत्र्य मिळूनही जगता
पारतंत्रतेच्या छायेत,
गुलामीचं आयुष्य का
गोड मानता अशा हवेत?
डॉ. बालाजी राजूरकर
ता.हिंगणघाट जि. वर्धा
0
4
0
9
0
3





