बाबासाहेब नाजरे यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे यांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: रविवार दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये संस्थेच्या स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात थोर आश्रय दाते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या ६१ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी त्यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय बाबासाहेब नाजरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे सचिव प्रभाकर म्हात्रे यांनी भुषविले.मुख्याध्यापक – प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्व. बाबासाहेब नाजरे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर व शिक्षक प्रतिनिधी सुनिल मोरे सर यांनी आपल्या मनोगतातून स्व. बाबासाहेब नाजरे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इ. १० वी, इ. ११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे करून स्व. बाबासाहेब नाजरे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अॕडव्होकेट जयंत चेऊलकर, सचिव प्रभाकर म्हात्रे, खजिनदार सुवर्ण कांबळी, सभासद सुहास म्हात्रे, सभासद दिपक राऊळ, संस्थेचे माजी उपाध्यक्ष व शालेय समिती विद्यमान सभासद मोरेश्वर म्हसकर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सुनिल मोरे सर, शिक्षकेतर प्रतिनिधी नथुराम म्हात्रे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इ. ५ वी ते इ. १२ वी पर्यंतचे सर्वं विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अजित नाईक सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर धनराज फड सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.





