कवितागडचिरोलीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
महामानवाला मानवंदना; अर्चना ईंकने
0
4
0
9
0
3
महामानवाला मानवंदना
डॉ बाबासाहेब आंबेडकर
अथांग सागराचे रुप
ज्ञानाच्या लाटांनी भरला
नव्या दिशांचा त्यांनी दिप
लढले झुंजारपणे
नाही घाबरले कुणा
क्रांतीची मशाल पेटवत
ठेवला हाच लढाऊ बाणा
जन्मभर देह झिजविला
शिक्षणाचा करूनी प्रसार
बाबाने लिहिले संविधान
केला दलितांचा उद्धार
अस्पृश्य दिनाची सेवा
अनाथांचा झालास वाली
आई रमाई सोबतीला
होती प्रेमळ माऊली
महामानव हा या भूमातेचा
क्रांतीसूर्य हा भारत मातेचा
उदय अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा
अभिमान वाटते बाबासाहेबाचा.
अर्चना राजू ईंकने
आरमोरी,गडचिरोली
0
4
0
9
0
3





