Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

नवरंग: स्त्री मनातले’; भाग : २

लेखिका- अनिता व्यवहारे, अहमदनगर

0 3 4 3 5 2

नवरंग: स्त्री मनातले’; भाग : २

लेखिका- अनिता व्यवहारे, अहमदनगर

नवरात्रीच्या नवरंगातल्या नवदुर्गेचे निरुपम दिसे रूप
रंग दुसरा हिरवे वस्त्र परिधान करून आली ब्रम्हचारीणीच्या रूपात
प्रेम उत्साह अन मांगल्य नांदो घराघरात
वंदन तुजला माते नवचैतन्य दे तू जीवनात..

रंग दुसरा “समजूतदारपणाचा”. योगायोगाने नवरात्रीचे दिवस होते. दुसरा दिवस, दुसरी माळ. खिचडी साबुदाण्याची लहान मुलांच्या आवडीची. त्यामुळे त्यावर यथेच्छ ताव मारून माझ्या नाती ओसरीवर खेळत होत्या. त्यांच्या खेळातल्या सगळ्या खेळण्या चटईवर पसरून त्यांचा खेळ चाललेला. तेवढ्यात एक दहा-बारा वर्षाची मुलगी आणि तिच्या कडेवर तीन वर्षाचं पोर. त्या मुलीने त्या छोट्या बाळासाठी माझ्या नातीकडे, ‘ए दीदी, आम्हाला खायला दे ना काहीतरी म्हणून मागितलं…’ माझी मोठी नात तशी समजूतदार. लगेच आजी,, आजी…ओरडत घरात पळत आली आणि मला सांगू लागली. अगं आजी बाहेर एक मुलगी आली.. तिच्या कडेवर छोटंसं बाळ आहे. त्यांना खूप भूक लागली काहीतरी खायला दे ना… ! मी ही लगेच पोळी भाजी काढली तिला द्यायला. आणि नातीला म्हणाले, ‘ चल, तिने गालातल्या गालात हसत, माझ्याकडे पाहिलं आणि गोड हसून, डोळे मिचकावत म्हणाली., आज्जी… थोडीशी खिचडी. तिच्या मनातले भाव समजले… तशी मी ताटात खिचडी ही ठेवली… ती आनंदली. आम्ही दोघी त्या मुलीला जेवण देण्यासाठी बाहेर आलो आणि समोरच दृश्य पाहून दोघी अवाक झालो. !!!

एरव्ही आपल्या खेळणीला कोणालाही हात न लावू देणारी, कुणी लावलाच तर घर डोक्यावर घेणारी माझी नात चक्क त्यातलं बरचं खेळणं त्या बाळाला देत होती. मी म्हणाले, ‘अगं हे गं काय? इतकी सारी खेळणी दिलीस त्याला! ‘अगं… आजी… जाऊssदेss गं ss’ तो खेळणी पाहून रडत होता. त्याच्या दीदीकडे खेळणी मागत होता. म्हणून मी दिली… तसं पण मी मोठ्ठी झालेय आता .!. शिवाय शाळेतल्या अभ्यासामुळे मला कुठे खेळायला वेळ मिळतो…. ‘ तिच्या ही चेहऱ्यावर एक “सात्विक आनंदाची लहर” पाहून मी आनंदून गेले आणि… आणि स्त्री मनातल्या या दुसऱ्या रंगाची छटा मनाला प्रसन्न करून गेली. हा मी अनुभवलेला “स्त्री तल्या समजूतदार मनाचा दुसरा रंग…!.”
(क्रमशः)

नवरात्रोत्सवाच्या सर्वांना नवरंगी शुभेच्छा

सौ अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 4 3 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
12:27