नाईक, सुलाखे,चव्हाण, कुलकर्णी, शिर्के यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी, वसुधा नाईक, पुणे
नाईक, सुलाखे,चव्हाण, कुलकर्णी, शिर्के यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी, वसुधा नाईक, पुणे
पुणे : 20 मे 2025 : जागतिक मधमाशी दिनानिमित्त सांजभेट आणि वर्ल्ड क्वीन बीज यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सांजभेट आणि वर्ल्ड क्वीन बीज संस्थांचे संस्थापक डाॅ.मधुसूदन घाणेकर होते.
सदर मेळाव्यात ‘ मधमाशी वाचवा : जग वाचवा ‘ या अभियानाच्या प्रसारकार्यास महत्वपूर्ण सहकार्य करणा-या कार्यकर्त्यांना डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते ‘ वर्ल्ड क्वीन बीज ॲवाॅर्ड 2025 ‘ जाहिररित्या प्रदान करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी जागतिक पातळीवर चालू असलेल्या ‘ मधमाशी वाचवा: जग वाचवा ‘ या अभियानाची महत्वपूर्ण माहिती दिली. युवा क्रांति संघटना पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष वसुधा नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सुलाखे , भारतीय जनता पार्टी – दिव्यांग सेलचे कार्यकर्ते अंकुश शिर्के तसेच विठ्ठल मुरकेवार , अशोक चव्हाण, नंदकिशोर गावडे, सुनंदा कुलकर्णी, सुधाकर नाईक, मिलिंद जोगळेकर आदिंना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते वर्ल्ड क्वीन बीज ॲवार्ड 2025 प्रदान करण्यात आले.
मधमाशी वाचवा अभियान तसेच साहित्य ,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात दोन दशकांहून अधिक योगदान देणा-या मधुकर्णिका सारिका सासवडे यांचा डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते विशेष जाहिर सत्कार करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या कलावंत मेळाव्यात मधुकर्णिका सासवडे, वसुधा नाईक, अशोक चव्हाण, सुनंदा कुलकर्णी , नंदकिशोर गावडे, शुभांगी कामत आदिंनी कविता, गाणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनितकालिकाच्या 758व्या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सुलाखे यांच्या शुभहस्ते जाहिर प्रकाशन करण्यात आले. विश्वकल्याणासाठी प्रत्येकाने यथाशक्य योगदान द्यावे असे आवाहन कार्यक्रमाच्या समारोपात डाॅ.घाणेकर यांनी केले.





